कळसुबाई मंदिर
महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असणाऱ्या शिखरांपैकी सर्वात उंच कळसुबाई शिखर हे असून त्याची समुद्रसपाटीपासून सुमारे १६४६ मीटर उंची आहे. याच शिखराच्या पायथ्याशी मौजे इंदोरे हे छोटेसेगाव नाशिक जिल्ह्यापासून सुमारे ६५ किलोमीटर अंतरावरआली घोटी शहराच्याप्रमुख बाजारपेठेपासून २० किलोमीटर अंतराच्या हाकेवर आहे.
महाराष्ट्र शासनाने कळसुबाई शिखर हे पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केले आहे या पर्यटन क्षेत्राला पर्यटकांसाठी एक प्रकारे पर्यटन स्थळाचा जणू काही वारसाच इंदोरे गावाला लाभलेला आहे.या पर्यटन क्षेत्राच्याइंदोरे गावाच्याआजूबाजूला अतिशय सुंदर असा निसर्गरम्य परिसर आहे.इंदोरे हे गाव नाशिक जिल्ह्यात येते शिवाय नाशिक आणि अहमदनगर या दोन्ही जिल्ह्याच्या सरहदीवर सह्याद्रीच्याडोंगराच्याकुशीत आणि इतर लगतच्या सुमारे ३०ते ४० गावांच्या मध्यभागी वसलेले आहे