ग्रामपंचायत इंदोरे

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

"अतुल्य इंदोरे, पर्यटन समृद्ध इंदोरे"

इंदोरे , ता. इगतपुरी जि. नाशिक

ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन

  • मुख्यमंत्री: मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस

  • उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. एकनाथ शिंदे

  • उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. अजित पवार

  • मंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. जयकुमार गोरे

  • राज्यमंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. योगेश कदम

  • प्रमुख सचिव, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.श्री. एकनाथ डवले

whatsapp image 2025 09 13 at 12.23.41 pm

ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पदाधिकारी
व कर्मचारी यांचे संपूर्ण नाव आणि फोटो

adhikar

ग्रामपंचायत अधिकारी

श्रीमती माधवी सुभाष मोरे

prashashk

प्रशासक

श्रीमती. वंदना अभिमान सोनवणे

tsgfsd

ग्रामपंचायत शिपाई

श्री. लालू रुंजा मोरे

wergw

पेसा मोबीलाईजर

सौ.पर्वती पंढरीनाथ धादवड

gtsdfgtr

पाणीपुरवठा कर्मचारी

श्री. चंदर शंकर गावंडे

erger

ग्रामपंचायत कम्प्युटर ऑपरेटर

श्री. निवृत्ती बळवंत जाधव

लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
गावाची ओळख व सर्वसाधारण माहिती

 

       कळसुबाई मातेच्या जन्माने पावन झालेले आणि आदिवासीआद्य क्रांतिकारकराघोजी भांगरे यांच्या पदस्पर्शानेसाखरलेले  नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात कळसुबाईशिखराच्या कुशीतवसलेले छोटेसे इंदोरे हे माझे गाव. !!              

इंदोरेगाव जरी छोटा असलं तरी म्हणतात ना ” मूर्ती लहान पण कीर्ती महान “असेहे छोटेसेइंदोरे गाव कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी अतिशय दुर्गम अशा डोंगराळ भागातकळसुबाई मातेच्या छात्र छायाखाली सुरक्षित वसलेले माझे छोटेसे इंदोरे गाव.इंदोरे गाव आणि त्या गावालगतच्या वाड्या वस्त्या ९५ % टक्के आदिवासी व ५% टक्के इतर समाजाचे असून एकूण लोकसंख्या सुमारे१९९५आणि कुटुंब संख्या ४३९ आहे यापैकी१९५ कुटुंब हे दारिद्र्यरेषेखाली आहेत येथील बहुतेक कुटुंबांची अतिशय गरीब परिस्थिती असून इतर कोणत्याही प्रकारचे उत्पनाचे व रोजगाराचे साधन नाही. हेसर्वचकुटुंब मिळेल तेव्हा मोल मजुरी करतात आणिआपापलेजीवन जगत असतात. गावातप्रत्येक कुटुंबालानळाद्वारे स्वच्छ आणि निरोगीपिण्याच्या पाण्याची सोय आहे. गावात सांडपाणी व्यवस्था म्हणून शोषखड्डे व भूमिगत गटारे आहेत. येथे दरवर्षी सुमारे ३००० मिलिमीटर इतका पाऊस पडतो परंतु  गावाला असणाऱ्या उतारामुळे येथे पडणारे पावसाचे सर्वपाणी जमिनीत न मुरता उताराच्या दिशेने वाहून जाते त्यामुळे येथे फक्त पावसाळ्यात एकच पीक घेतले जाते ते म्हणजे मुख्यभातपीकहे होय.

इंदोरेगाव जरी लहान असले तरी माणसा माणसात आहे प्रेमाचे संस्कार, मातीतले माणसे, मातीतले नाती,  अनेक जाती, अनेक धर्म , पण वागतो प्रत्येक जण इथे नम्र, गावात१० सभासद असणारी छोटीशी ग्रामपंचायत कार्यरत आहे आणि गावात२ जिल्हा परिषद शाळा, ३अंगणवाड्या, गावात लहान सहान असे ७मंदिरे आहेतगावचे कुलदैवत कळसुबाई माता, मरीआई माता,आदिवासींचे श्रद्धास्थान असलेले श्रीमहादेव मंदिर. तसेच गावाच्या मध्यभागी गावचे आराध्य दैवत  मारुतीरायाचे व विठ्ठल रुक्मिणीचे लाकडी जुने पुरातनकालीन असे मोठी मंदिरे असून गावात,दरवर्षीकळसूबाईचीयात्राआणिहरिनामसप्ताहहेकार्यक्रमहीसाजरे केले जातात याकार्यक्रमांच्या माध्यमातूनआदिवासींच्यासंस्कृतीचे प्रबोधन, जनजागृती, अध्यात्मिक प्रवचन, भजनकिर्तन,आरोग्य व शिक्षण यावरजनजागृतीकरणेअशाविविधउपक्रमातून प्रबोधनहीकेले जाते. तसेचकळसुबाई यात्रेच्या दिवशी आदिवासींची जोपासली जाणारी संस्कृतीच्या कार्यक्रमाचे आयोजनही केले जाते जसे की,आदिवासी गावरानीतमाशा,बांगडा नाच, कामडावनातीरकामटा, तमाशा हजेरी, कुस्त्या, आदिवासी नृत्य, नाचगाणे अशा अनेक प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

गावाच्या दक्षिणेला कळसुबाई शिखरावरती गावाची कुलदैवत असणारी कळसुबाई मातेचे मंदिर असून या देवीचीदरवर्षी चैत्र पौर्णिमेला मोठी यात्रा भरते यावेळीसर्व राग, हर्ष,जातीभेद, वैर,विसरून सर्व गाव सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्री उत्सव,हरिनाम सप्ताह, शिवजन्मोत्सव,भीम जयंती उत्सव, बिरसा मुंडा, रामोजी भांगरे अशा तसेच इतर थोर महापुरुषांच्या जयंती मोठ्या आनंदाने साजरे केले जातात.

आमची शाळा म्हणजे आमचे विद्येचे माहेरघर आहे गावात जिल्हा परिषदेच्या२(दोन )शाळा असून१(एक ) इयत्ता सातवी पर्यंतकेंद्रशाळा आहे. ३(तीन )  अंगणवाड्या आहेत. विद्यार्थ्यांना माध्यमिक,उच्च माध्यमिक,उच्च शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावी जावे लागते अशा बिकट.परिस्थितीमध्येगावच्याविद्यार्थीविद्यार्थीनीने अथक परिश्रम घेऊन गावाचे नाव उज्वल करणारे वकील,शिक्षक,डॉक्टर,इंजिनियर  तसेच शासकीय अधिकारी इत्यादी क्षेत्रात गावातीलविद्यार्थ्यांनी/ व्यक्तीने उल्लेखनीय कार्य केले असून त्यांच्या व शिक्षकांच्या मार्गदर्शनाने व गावकऱ्यांच्या सहकाऱ्याने विविध क्षेत्रात नाव गाजवलेलेआहे.तसेच माझेइंदोरे गाव सर्वचबाजूनेलवकरच नंदनवन होईल असे ध्येय बाळगणारेअनेक कलागुणानेअसणारे माझ्यातरुण युवकांचेइंदोरे गाव!!!

समाजकारणासोबत इंदोरे गावहे राजकीय दृष्ट्या अग्रेसर असून अनेक पदे गावच्या पदरात पाडले आहेत शेतकरी संघटनेचे पद, क्रांतिकारी संघटना, अनेक सामाजिक संघटना, बाजार समिती, सभापती,जिल्हा परिषद सदस्यइत्यादीसह सर्व ठिकाणी मजबूत पकड असलेले सर्वच राजकीय धुरंदर नेते गावात असल्याने गाव विविध माध्यमातून विकासाच्या बाबतीत प्रयत्नशील आहे.

सामाजिक कार्य असो , सार्वजनिक कार्यक्रम असो किंवा कोणत्याही समाजाचाजातीधर्माचाकार्यक्रमअसो हे सर्व गावातील कार्यक्रम एकदिलानेमिळून मिसळून करण्यासाठी आमचे इंदुरेकर नेहमीच अग्रेसरअसतात !!!

      !! असे सर्व सोयी सुविधांनी नटलेले माझे गाव छोटेसेइंदोरे गाव !!

🏞️ भौगोलिक वैशिष्ट्ये

गावाभोवती हिरवीगार शेतं, छोटे डोंगर, पावसाळ्यात ओसंडून वाहणारे नाले आणि झरे ही नैसर्गिक वैशिष्ट्ये आहेत. गावाच्या शेजारी काही छोटे धरणे व तलाव आहेत, जे पाणीपुरवठा आणि सिंचनासाठी उपयुक्त ठरतात. या परिसरामुळे येथे पर्यटनाची संधीही वाढू लागली आहे. काही ठिकाणी होमस्टे व रिसॉर्ट्सची उभारणी होत आहे.
सदरील गाव हे पेसा क्षेत्रांतर्गत येते.

कळसुबाई मंदिर 

महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असणाऱ्या शिखरांपैकी सर्वात उंच कळसुबाई शिखर हे असून त्याची समुद्रसपाटीपासून सुमारे१६४६ मीटर उंची आहे. याच शिखराच्या पायथ्याशी मौजे इंदोरे हे छोटेसेगाव नाशिक जिल्ह्यापासून सुमारे६५ किलोमीटर अंतरावरआली घोटी शहराच्याप्रमुख बाजारपेठेपासून२०किलोमीटर अंतराच्या हाकेवर आहे. महाराष्ट्र शासनाने कळसुबाई शिखर हे पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केले आहे या पर्यटन क्षेत्राला पर्यटकांसाठी एक प्रकारे पर्यटन स्थळाचा जणू काही वारसाच इंदोरे गावाला लाभलेला आहे.या पर्यटन क्षेत्राच्याइंदोरे गावाच्याआजूबाजूला अतिशय सुंदर असा निसर्गरम्य परिसर आहे.इंदोरे हे गाव नाशिक जिल्ह्यात येते शिवाय नाशिक आणि अहमदनगर या दोन्ही जिल्ह्याच्या सरहदीवर सह्याद्रीच्याडोंगराच्याकुशीत आणि इतर लगतच्या सुमारे३०ते ४० गावांच्या मध्यभागी वसलेले आहे.  इंदोरेगावाच्या पूर्व,पश्चिम,दक्षिण व उत्तर अशा चारही बाजूस अलंग,मलंग,कुलंग नामक तीन किल्ले आहेत.शिवायसांदणदरी ,भंडारदरा धरण, भावली धरण, या धरणाला लागून असलेलेपाण्याचे धबधबे, हे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एक सुंदर असा परिसर हाइंदोरे गावाला लागूनच आहे. मात्र यामध्ये सर्वात जास्त आकर्षित करणारे प्रेक्षणीय स्थळ म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळखले जाणारे कळसुबाई शिखर हे पर्यटकांचा मुख्य केंद्रबिंदू ठरत असूनयामुळेएक प्रकारे इंदोरे हे गाव मुख्य आकर्षक स्थळ म्हणून पर्यटकांसाठी उदयास आले आहे इंदोरेगावच्या तसेच कळसुबाई शिखराच्या सभोवताली असणारी निसर्गरम्य पर्यटन स्थळे जसे की, बाडगीचीमाची, सर्वतीर्थ टाकेद, पट्टा किल्ला (विश्रामगड), रंधा फॉल धबधबा, भंडारदरा धरण, सांधण दरी,घाटकर वीज विद्युत प्रकल्प, कोकणकडा, रतनगड किल्ला, हरिचंद्र गड, आजोबाचा डोंगर, कपिलधारा तीर्थ (कावनई) किल्ला, वैतरणा विद्युत प्रकल्प, त्र्यंबकेश्वर तीर्थ अलंग,मलंग, कुलंग हेतीनकिल्ले, भावली धरण व तेथील धबधबे इत्यादी स्थळे इंदोरे गावापासून अगदी हकेच्याच अंतरावर असून याप्रसिद्ध स्थळांमुळेइंदोरे हे गाव एक दृष्टीनेआकर्षक बनला आहे या सर्व स्थळांपैकी कळसुबाई शिखर हे इंदोरे गावाला लागूनच असून हेच पर्यटकांसाठी सर्वात आकर्षक पर्यटन स्थळ आहे ही सर्व स्थळे / ठिकाणे नाशिक जिल्ह्यातीलइगतपुरी तालुक्यातयेतात शिवाय या स्थळांपैकी सर्वात जास्त आकर्षित करणारे प्रेक्षणीय स्थळ म्हणजे कळसुबाई शिखर आणि इंदोरे हे गाव 

जनगणना मापदंड | जनगणना माहिती
जनगणना मापदंड जनगणना माहिती
एकूण लोकसंख्या 1048
घरांची एकूण संख्या 167
महिला लोकसंख्या % 50.5 % (529)
एकूण साक्षरता दर % 45.6 % (478)
महिला साक्षरता दर % 17.9 % (188)
अनुसूचित जमाती लोकसंख्या % 66.4 % (696)
अनुसूचित जाती लोकसंख्या % 4.6 % (48)
कार्यरत लोकसंख्या % 62.7 %
बालके (0-6) लोकसंख्या 2011 नुसार 207
मुलींची बालके (0-6) लोकसंख्या % 2011 नुसार 53.1 % (110)

खरोली २०११ च्या जनगणनेचा तपशील

खरोलीची स्थानिक भाषा मराठी आहे. खरोली गावाची एकूण लोकसंख्या १०४८ आहे आणि घरांची संख्या १६७ आहे.
महिला लोकसंख्या ५०.५% आहे. गावातील साक्षरता दर ४५.६% आहे आणि महिला साक्षरता दर १७.९% आहे.

🌱गावामध्ये विविध विकास कामे आणि उपक्रमाची माहिती
vruksh

वृक्ष लागवड

1

जि. प. केंद्र शाळा

2

जि.प.प्रा.शा.कॉलनीवाडी

4

कळसुबाई मंदिर

गावातील सविस्तर माहिती

शासन निर्देशित उपक्रम साजरे करताना

एकुण ३ जि.प शाळा 1.खरोली गाव (इयत्ता पहिली ते पाचवी) 2. मास्तरवाडी (इयत्ता पहिली ते पाचवी) 3. दोनही शाळा या विद्यार्थ्यांना अध्ययनात अभिरुची निर्माण व्हावी याकरिता पंचायतीमार्फत पुरवठा करण्यात आलेल्या तंत्रज्ञान युक्त स्मार्ट टीव्ही संच व इतर शैक्षणिक साहित्य सोबत संगीत साहित्य पुरवठा असलेल्या सर्व सुविधा नियुक्त शाळा आहेत

ग्रामपंचायत माहिती

ग्रामपंचायत आहे: होय (खारोली स्वतःची ग्रामपंचायत आहे) जवळचं तहसील ठिकाण: त्र्यंबक (~20 किमी) जवळचं जिल्हा ठिकाण: नाशिक (~45 किमी)

शिक्षण

सामान्य साक्षरता दर: ~56.84% पुरुष साक्षरता: ~68.72% महिला साक्षरता: ~44.87%

खरोली येथील लोकसंख्या व शेती विषयक माहिती खालीलप्रमाणे आहे

अनुसूचित जाती (SC) व
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या

कामगार वर्ग (Workforce)

शेती व भूवापर

गावाचा नकाशा

या नकाशा मदतीने गावातील महत्त्वाच्या रस्ते, ठिकाणे आणि कार्यालयांची माहिती तसेच त्यांचे अचूक स्थान सहज पाहता येईल.

प्रशासकीय संरचना
1
2
6
3

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी

आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा

कृपया आपले नाव, ई-मेल पत्ता, मोबाईल क्रमांक आणि संदेश योग्यरित्या भरा.
bg shape.jpg

📲 खरोली ग्रामपंचायत आता सोशल मीडियावर!

ग्रामपंचायतीचे सर्व उपक्रम, शासकीय योजना, विकासकामे आणि विशेष कार्यक्रमांविषयी माहिती आता थेट सोशल मीडियावर उपलब्ध आहे.

 

Follow करा आमच्या अधिकृत अकाउंट्स:

1 (2)

फोटो गॅलरी