ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती
ग्रामपंचायत माहिती
कळसुबाई मातेच्या जन्माने पावन झालेले आणि आदिवासीआद्य क्रांतिकारकराघोजी भांगरे यांच्या पदस्पर्शानेसाखरलेले नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात कळसुबाई शिखराच्या कुशीतवसलेले छोटेसे इंदोरे हे माझे गाव. !! इंदोरेगाव जरी छोटा असलं तरी म्हणतात ना ” मूर्ती लहान पण कीर्ती महान “असेहे छोटेसेइंदोरे गाव कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी अतिशय दुर्गम अशा डोंगराळ भागातकळसुबाई मातेच्या छात्र छायाखाली सुरक्षित वसलेले माझे छोटेसे इंदोरे गाव.इंदोरे गाव आणि त्या गावालगतच्या वाड्या वस्त्या ९५ % टक्के आदिवासी व ५% टक्के इतर समाजाचे असून एकूण लोकसंख्या सुमारे१९९५आणि कुटुंब संख्या ४३९ आहे यापैकी१९५ कुटुंब हे दारिद्र्यरेषेखाली आहेत येथील बहुतेक कुटुंबांची अतिशय गरीब परिस्थिती असून इतर कोणत्याही प्रकारचे उत्पनाचे व रोजगाराचे साधन नाही. हेसर्वचकुटुंब मिळेल तेव्हा मोल मजुरी करतात आणिआपापलेजीवन जगत असतात. गावातप्रत्येक कुटुंबालानळाद्वारे स्वच्छ आणि निरोगीपिण्याच्या पाण्याची सोय आहे. गावात सांडपाणी व्यवस्था म्हणून शोषखड्डे व भूमिगत गटारे आहेत. येथे दरवर्षी सुमारे ३००० मिलिमीटर इतका पाऊस पडतो परंतु गावाला असणाऱ्या उतारामुळे येथे पडणारे पावसाचे सर्वपाणी जमिनीत न मुरता उताराच्या दिशेने वाहून जाते त्यामुळे येथे फक्त पावसाळ्यात एकच पीक घेतले जाते ते म्हणजे मुख्यभातपीकहे होय.
२०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार इंदोरे लोक्संख्याचा संक्षिप्त आढावा दिला आहे.
जनगणना मापदंड | जनगणना माहिती
| अ.क्र. | तपशील | एकूण | पुरुष | स्त्री |
|---|---|---|---|---|
| १ | एकूण लोकसंख्या | १५९१ | ७५२ | ८३९ |
| २ | अनुसूचित जाती (SC) | १४५ | ||
| ३ | अनुसूचित जमाती (ST) | १५३१ |
“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”
गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला
राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
प्रशासकीय संरचना
ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील
| अ.क्र. | लोकसेवेचे नाव | कामकाजाचे दि. | प्र. फी | पदनिर्देशित अधिकारी |
|---|---|---|---|---|
| १. | जन्म नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| २. | मृत्यू नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ३. | विवाह नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ४. | दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | सा.ग.ट.बि.अ |
| ५. | ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ६. | नमुना ‘८’ चा उतारा | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ७. | निराधार असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | ग्रामपंचायत अधिकारी |